आयपीएल आणि पीएसएल ब्रँड व्हॅल्यूमध्ये जमीन-अस्मानाचा फरक; आयपीएल पाकिस्तान लीगपेक्षा तब्बल इतक्या पटीने श्रीमंत!

2026 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या (India and Pakistan) क्रिकेट विश्वातील दोन सर्वात मोठ्या लीग आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तान सुपर लीगच्या 11 व्या हंगामाची (PSL 11) सुरुवात 26 मार्च रोजी होईल, तर त्याच्या अवघ्या दोन दिवसांनंतर आयपीएल (IPL 2026) सुरू होणार आहे. या दोन्ही स्पर्धा एकाच वेळी खेळवल्या जाणार असल्याने, त्याचा पाकिस्तान सुपर लीगच्या प्रेक्षकसंख्येवर (Viewership) मोठा परिणाम होऊ शकतो. मात्र, या दोन्ही लीगच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये किती अवाढव्य फरक आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) बद्दल बोलायचे झाले तर, ही जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा लीगपैकी एक मानली जाते. 2008 मध्ये सुरू झालेल्या या लीगची ब्रँड व्हॅल्यू 2025 च्या रिपोर्टनुसार 18.5 बिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे 1.56 लाख कोटी रुपये) इतकी आहे. या प्रचंड आकड्यांमुळे आयपीएलने जागतिक स्तरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
दुसरीकडे, 2016 मध्ये सुरू झालेल्या पाकिस्तान सुपर लीगची (PSL) ब्रँड व्हॅल्यू आयपीएलच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. पीएसएलची ब्रँड व्हॅल्यू साधारण 150 ते 200 मिलियन अमेरिकन डॉलरच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. जर आपण ही व्हॅल्यू 200 मिलियन डॉलर (सुमारे 1,840 कोटी रुपये) धरली, तरी आयपीएल ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत पाकिस्तानच्या लीगपेक्षा 92.5 पटीने पुढे आहे.
कोणत्याही लीगच्या कमाईचा मुख्य स्त्रोत हा ‘ब्रॉडकास्टिंग राइट्स’ (प्रसारण हक्क) असतो. पीएसएलचे पुढील 4 वर्षांचे हक्क साधारण 93 मिलियन डॉलर्समध्ये विकले गेले आहेत. याउलट, आयपीएलचे 2023 ते 2027 या कालावधीसाठीचे हक्क तब्बल 48,390 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, आर्थिक बाबतीत पीएसएल आयपीएलच्या आसपासही कुठे टिकत नाही.
Comments are closed.