‘लाडकी बहीण’ योजनेत 164 कोटींचा घोटाळा, 12 हजार भावांनी 13 महिने घेतले प्रत्येकी दीड हजार

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत 164 कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या योजनेत तब्बल 12 हजार 431 पुरुषांनी 13 महिने प्रत्येकी दीड हजार रुपये घेतल्याचे उघड झाले आहे.
माहितीच्या अधिकारातून ही पोलखोल झाली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. त्यात या 12 हजार भावांनीही लाभ घेतल्याचे समोर आले. महिला व बालविकास विभागातील अधिकाऱयांनीही याला दुजोरा दिला. ही नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला अशा 77 हजार 980 महिलांनाही अपात्र ठरवण्यात आले. त्यांना 12 महिन्यांपर्यंत ही रक्कम मिळाली. या बोगस पुरुष लाभार्थींच्या खात्यात 25 कोटी तर अपात्र महिलांच्या खात्यात सरकारचे 140 कोटी गेले.
- सुमारे 26 लाख लाभार्थी अपात्र आहेत.
- लाखो संशयित खाती योजनेच्या यादीतून वगळण्यात आली.
- पुरुष लाभार्थ्यांनी जुलै 2024 ते जुलै 2025 या काळात लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले. त्यानंतर पैसे थांबवले गेले, पण वसुली केली गेली नाही.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाहून अधिक होते किंवा एका कुटुंबात दोन किंवा त्याहून अधिक सदस्यांनी योजनेचा लाभ घेतला अशा 77 हजार महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आले.
Comments are closed.