ठाण्यात शिवसेना-मनसेच्या मोर्च्याला सुरुवात; पालिकेच्या भ्रष्टाचार, बेकायदा बांधकामांविरुद्ध हजारो नागरिक उतरले रस्त्यावर

ठाणे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचार, लाचखोरी, वाहतूककोंडी, पाणीटंचाई, बोकाळलेली बेकायदा बांधकामे याविरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या मोर्च्याला सुरुवात झाली आहे. या मोर्च्यात हजारो ठाणेकर सामील झाले असून रस्त्यावर उतरले आहेत.

ठाणे महापालिकेत गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने या कारभारावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱयांचे फावले असून सर्व खात्यांमध्ये मनमानी कारभार सुरू आहे. सरकारकडून कोटय़वधी रुपयांचा निधी मिळाला, पण नेमका तो कुठे खर्च झाला याचा जाब आज निघालेल्या शिवसेना, मनसेच्या मोर्चात प्रशासनाला विचारला जात आहे.

Comments are closed.