सारा तेंडुलकरचं फोटोशूट चर्चेत!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर हिचे फोटोशूट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. सारा सध्या ऑस्ट्रेलियात असून ती ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड प्रांतात भटकंती करत आहे. यादरम्यान तिने लिझार्ड आइसलँड येथे खास फोटोशूट केले. फोटोत बाजूला घनदाट वनराई दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन विभागासाठी तिने हे फोटोशूट केल्याचे साराने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. या फोटोशूटवेळी साराने समुद्रकिनारी काही फोटोशूट केले. तसेच नितळ निळ्याशार समुद्रात पोहोचण्याचाही आनंद लुटला.
Comments are closed.