जम्मू-कश्मीर आपलंच असेल! पहलगाम हल्ल्याच्या कटातील सूत्रधाराची हिंदुस्थानला धमकी

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणाव वाढतच चालला आहे. हिंदुस्थानने पहलगाम हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर खवळलेला पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार लश्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरीने पुन्हा एकदा हिंदुस्थानला डिवचले आहे. हिंदुस्थानच्या सरकारने लक्ष देऊन ऐकावे, संपूर्ण जम्मू आणि कश्मीर आमचेच असेल, असे सैफुल्लाह बरळला आहे. त्याच्या या धमकीनंतर हिंदुस्थानच्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दहशतवादी घटना रोखण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी एप्रिलमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर मे महिन्यात हिंदुस्थानी हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर राबवले, ज्यात पाकिस्तानला हार मानावी लागली. या पराभवामुळे लश्कर-ए-तोयबाच्या प्रमुखाने हिंदुस्थानला धमकी दिली आहे.

मसूद अझहरनेच संसदेवर हल्ला घडवून आणला, जैशच्या कमांडरच्या कबुलीने शाहबाज शरीफची झोप उडणार

“हिंदुस्थानी सरकारने काळजीपूर्वक ऐकावे आणि त्यांच्या नागरिकांना कळवावे. इन्शा अल्लाह, या नद्या आमच्या असतील, त्यांची धरणे आमची असतील आणि संपूर्ण जम्मू-कश्मीर आमचे असेल. आज तुम्ही जे काही करत आहात, इन्शा अल्लाह, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आज जे काही घडत आहे त्याचा बदला घेतला जाईल. ईंट का जवाब पत्थर से दिला जाईल. आम्ही आमचे प्राण पणाला लावून आमच्या देशाच्या प्रत्येक इंच-इंच, कणा-कणाचे रक्षण करू, अशी धमकी सैफुल्लाह दिली.

Breaking – कॅनडामधील खलिस्तानींकडून हिंदुस्थानी वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याची धमकी

सैफुल्लाह कसुरी हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील असून तो लश्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख आहे. तो दहशतवादी हाफिज सईदचा जवळचा मानला जातो. सैफुल्लाह गेल्या 20-25 वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे. सैफुल्लाह वेळोवेळी हिंदुस्थानविरुद्ध गरळ ओकत असतो. पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्येही त्याचा सहभाग असतो.

Comments are closed.