दिल्लीत अटक केलेली धार्मिक रूपांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड

कोंडलेल्या हिंदू मुलीची सुटका, लव्ह जिहाद प्रकार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे नुकत्याच उघडकीस आलेल्या हिंदू युवतींच्या धर्मांतर रॅकेटचा सूत्रधार अब्दुल रहमान याला उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्लीत अटक केली आहे. दिल्लीच्या मुस्तफाबाद भागात त्याच्या निवासस्थानावर धाड घालून त्याला अटक करण्यात आली. त्याच्या घरात कोंडण्यात आलेल्या एका हिंदू मुलीचीही सुटका करण्यात आली आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून त्याने या मुलीला आपल्या कारस्थानाची शिकार बनविले होते, असा त्याच्यावर आरोप आहे.

या प्रकणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, अब्दुल रहमान याची अटक ही सर्वात महत्वपूर्ण मानण्यात येत आहे. त्याची कसून चौकशी केली जाणार असून त्याच्याकडून या रॅकेटची पाळेमुळे कोठपर्यंत पोहचली आहेत, याची माहिती मिळविली जाणार आहे, असे प्रतिपादन पोलींसांनी केले.

लव्ह जिहाद प्रकरण

रहमान याच्या घरात सापडलेल्या हिंदू मुलीशी जुनैद नामक मुस्लीम युवकाने सोशल मिडियाच्या माध्यमातून मैत्री केली. त्यानंतर तिला दिल्लीला बोलाविण्यात आले. तिचे धर्मांतर करुन तिला मुस्लीम बनविण्यात आले आणि नंतर तिचा जुनैद याच्याशी निकाल लावण्यात आला. जुनैद हा विवाहित आहे. तथापि, त्याने अविवाहित असल्याचे नाटक करुन हिंदू मुलीची फसवणूक केलाr, असे प्रतिपादन आग्रा जिल्ह्याचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी केले आहे.

प्रक्षोभक धार्मिक साहित्य जप्त

अब्दुल रहमान याच्या घरातून पोलिसांनी प्रक्षोभक धार्मिक साहित्य, पुस्तके. पत्रके आणि इतर सामग्री जप्त केली आहे. या सर्व सामग्रीची तपासणी केली जात आहे. आग्रा पोलिसांनी 19 जुलैला या व्यापक आणि विस्तृत धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर या कारस्थानात सामील असणाऱ्यांचे अटकसत्र हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अनेक राज्यांमध्ये विस्तार

धर्मांतर आणि लव्ह जिहादचे हे जाळे अनेक राज्यांमध्ये विस्तारल्याचे या प्रकरणाच्या तपासतून उघड झाले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले हस्तक विविध राज्यांमधील आहेत. गोव्यातून आयेशा हिला, कोलकात्यातून अली हसन आणि ओसामा यांना, आग्रा येथून रहमान कुरेशी याला, देहराडूनमधून अबुर रहमान याला, राजस्थानातून मोहम्मद अली आणि जुनैद कुरेशी यांना, तसेच अन्य राज्यांमधून तीन जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

आयएसआयएसचे कनेक्शन

आग्रा येथील धर्मांतरणाच्या रॅकटशी आयएसआयएस या मुस्लीम दहशतवादी संघटनेचे कनेक्शन आहे, ही बाबही आतापर्यंतच्या तपासातून उघड झाली आहे. हे रॅकेट चालविणाऱ्यांना विदेशांमधून मोठ्या प्रमाणावर पैसा पुरविला जात आहे, असेही उघड होत आहे. या सर्व कारस्थानाची पाळेमुळे उखणून काढण्याचा निर्धार उत्तर प्रदेशचे प्रशासन आणि उत्तर प्रदेशच्या पोलीसांनी केला आहे.

 

Comments are closed.