T20 WC26: श्रीलंकेच्या सुपर-8 मधील अडचणीत वाढ! वेगवान गोलंदाज झाला दुखापतग्रस्त

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला. तो पहिल्याच षटकात गोलंदाजी करताना जखमी झाला. सोमवारी (१६ फेब्रुवारी) झालेला हा सामना श्रीलंकेने ८ विकेट्सने जिंकला. त्यामुळे श्रीलंका सुपर-८मध्ये पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डावात तिसऱ्या षटकात गोलंदाज करताना पथिराना थांबला तेव्हा त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याचे दिसले. त्याने ते षटक पूर्ण न करताच मैदानाबाहेर गेला. त्याचे ते षटक कर्णधार दसुन शनाकाने टाकले. पथिरानाने त्या षटकातील चार चेंडू टाकले असता ३ धावा दिल्या.
पथिराना मैदानाबाहेर जाताना अडखळताना दिसला. श्रीलंकेच्या संघातून आधीच वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. आता पथिरानाच्याबाबतीत ते कोणतीही जोखीम घेऊ शकत नाही. हसरंगा या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दुखापतग्रस्त झाला. आयर्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात त्याने ४ षटकात २५ धावा देत ३ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्यांचा हा महत्वाचा गोलंदाज बाहेर झाला आणि आता पथिरानाची दुखापत यामुळे श्रीलंकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसे हसरंगाच्या जागी दुशन हेमंथाला संघात घेतले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील सर्वाधिक वेळ पथिरानाने ड्रेसिंग रुममध्येच घालवला. यामुळे तो गोलंदाजीसाठी परतलाच नाही. तसेच सामन्यानंतर त्याला स्कॅनिंगसाठी पाठवले गेले.
या स्पर्धेत श्रीलंका सुपर-८मध्ये पोहोचला असला तरी आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने त्यांचा प्रवास सुखकर होणार नाही. पथिराना हा डेथ ओव्हर्समधील त्यांचा उत्तम गोलंदाज आहे.
Comments are closed.