मथीशा पथिरानाची लॉटरी! KKR मध्ये सामील होताच ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 व्या हंगामासाठी अबू धाबी येथे 369 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनला 25.20 कोटी रुपयांना विकत घेऊन सर्वात महागडा परदेशी खेळाडू बनवले. त्यानंतर, केकेआरने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना (Matheesha pathirana) याच्यावरही कोट्यवधींची उधळण केली.

लखनऊ सुपर जायंट्ससोबतच्या चुरशीच्या शर्यतीत कोलकात्याने बाजी मारली आणि पथिरानाला 18 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले. या बोलीसह पथिराना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू ठरला आहे.

मथीशा पथिरानाला खरेदी करण्यासाठी केकेआरने मोठी रक्कम खर्च केली आहे. हा खेळाडू संघासाठी केवळ एक गोलंदाज नसून एक ‘मॅच विनर’ देखील आहे. पथिरानाची खासियत म्हणजे तो दबावाच्या परिस्थितीत उत्तम कामगिरी करतो. विशेषतः टी-20 सामन्यांच्या डेथ ओव्हर्समध्ये (अंतिम षटकांत) तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याच्या अचूक यॉर्करसमोर मोठे फलंदाज देखील अडखळताना दिसतात.

मथीशा पथिरानाने 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी सीएसकेने त्याला केवळ 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर बदली खेळाडू म्हणून घेतले होते. 2022 च्या हंगामात त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना चकित केले. डेथ ओव्हर्समधील त्याचे नियंत्रण आणि यॉर्कर टाकण्याची कला यामुळे तो टी-20 फॉरमॅटमधील एक घातक खेळाडू बनला आहे.

Comments are closed.