“जो रूटने शतक नाही केलं तर मी MCG वर नग्न फिरेल!” या क्रिकेटपटूने लावली अनोखी पैज….

इंग्लंडचा दिग्गज कसोटी फलंदाज जो रूट गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने अलिकडेच भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत शानदार फलंदाजी केली. त्या मालिकेत जो रूटने 500 हून अधिक धावा केल्या. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने रूटबद्दल एक मोठे विधान केले आहे. जो रूटने आतापर्यंत 39 कसोटी शतके झळकावली आहेत, परंतु आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात एकही कसोटी शतक झळकावले नाही.

हेडनने ऑल ओव्हर बार द क्रिकेट या क्रिकेट शोच्या यूट्यूब चॅनलवर एक मोठे विधान केले. त्याने म्हटले की जर इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जो रूटने शतक झळकावले नाही तर तो (हेडन) कपड्यांशिवाय मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर फिरेल. शिवाय त्याने विश्वास व्यक्त केला की यावेळी रूट निश्चितच ऑस्ट्रेलियन भूमीवर त्याच्या शतकाचा दुष्काळ संपवेल. अ‍ॅशेस मालिका 21 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होईल आणि यावेळी पाचही कसोटी सामने खेळले जातील.

हेडनची ही अट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खरी मजा तेव्हा आली, जेव्हा त्याची मुलगी आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर ग्रेस हेडनने शोच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रिअॅक्ट केले. तिने विनोदी अंदाजात जो रूटला विनंती केली – “प्लीज जो रूट, एक शतक तरी कर. नाहीतर पप्पांची नग्न फिरण्याची शपथ आम्हालाच लाजिरवाणी करून सोडेल.”

रूटच्या कसोटी क्रिकेटमधील आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर त्याने इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके केली आहेत. रूटने 134 कसोटींमध्ये 13543 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 51.29 आहे. त्याने आतापर्यंत 30 शतके केली आहेत. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या 14 कसोटींमध्ये त्याने अद्याप एकही शतक केलेले नाही. त्याने ऑस्ट्रेलियन भूमीवर 892 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 9 अर्धशतके केली आहेत.

Comments are closed.