मौलाना तौकीरचा जामीन फेटाळला

वृत्तसंस्था / बरेली (उत्तर प्रदेश)

उत्तर प्रदेशातील बरेली येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या धार्मिक दंगलीतील एक प्रमुख आरोपी मौलाना तौकीर रझा यांचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला आहे. बरेलीच्या इस्लामिया मैदानात रझा यांनी मुस्लीमांचा जमाव जमविला होता. या कार्यक्रमाला अनुमती नाकारली असतानाही त्यांनी जमाव जमविला आणि प्रक्षोभक भाषण केले. त्यामुळे जमाव भडकला आणि त्याने पोलिसांवर दगडफेक केली होती. तसेच शहरात जाळपोळ आणि दगडफेक केली होती. या प्रकरणी मौलाना रझा यांना अटक करण्यात आली असून अन्य 125 जणांवरही दंगल भडकविल्याचे आणि केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. अन्य 2,500 अज्ञातांच्या विरोधातही दंगलीचा गुन्हा नोंद झाला असून कारवाई केली जात आहे.

Comments are closed.