IPL ऑक्शनमध्ये कोणत्याच संघमालकाने ढुंकूनही पाहिलं नाही, Unsold राहिला, पण त्याच खेळाडूकडे आता
कर्नाटक विजय हजारे करंडक संघ : भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. तब्बल सहा वर्षांनंतर तो विजय हजारे ट्रॉफीत कर्नाटकच्या जर्सीत दिसणार आहे. विशेष बाब म्हणजे आयपीएल 2026 मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली केएल राहुल हा देशांतर्गत वनडे स्पर्धा खेळणार आहे.
कर्नाटकने संघाची घोषणा
अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शुभमन गिलच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करणारा केएल राहुल आता देशांतर्गत क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. 33 वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज कर्नाटकच्या विजय हजारे ट्रॉफी 2025–26 च्या संघात निवडला गेला आहे. या स्पर्धेला 24 डिसेंबरपासून सुरुवात होणार असून, कर्नाटकने बुधवारी 17 डिसेंबर रोजी आपल्या संघाची घोषणा केली.
केएल राहुलसोबत प्रसिद्ध कृष्णालाही संघात स्थान
केएल राहुलसोबत वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णालाही संघात स्थान देण्यात आले आहे. प्रसिद्ध कृष्णा देखील अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. याशिवाय, देवदत्त पडिक्कलचीही कर्नाटक संघात पुनरागमन झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) नव्या धोरणानुसार आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, या भूमिकेला अनुसरूनच कर्नाटकचा हा निर्णय मानला जात आहे.
अनसोल्ड राहिला, पण त्याच अग्रवालकडे आता कर्णधारपद
यंदा विजय हजारे ट्रॉफीत कर्नाटक संघाची धुरा मयंक अग्रवालच्या खांद्यावर असणार आहे. विशेष म्हणजे, मयंक अग्रवाल आयपीएल 2026 मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. तर अनुभवी फलंदाज करुण नायरकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे केएल राहुल अनेक वर्षांनंतर मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली देशांतर्गत वनडे क्रिकेट खेळताना पाहायला मिळणार आहे.
विजय हजारे ट्रॉफीत कर्नाटकला ग्रुप-A मध्ये स्थान देण्यात आले असून, या गटात झारखंड, केरळ, तमिळनाडू, पुदुचेरी, त्रिपुरा, राजस्थान आणि मध्य प्रदेश हे संघ आहेत. कर्नाटक आपले सर्व गट सामने अहमदाबाद येथे खेळणार असून, त्यांचा पहिला सामना 24 डिसेंबर रोजी झारखंडविरुद्ध होणार आहे.
केएल राहुलची विजय हजारे ट्रॉफीमधील कामगिरी
केएल राहुलने अखेरचा विजय हजारे ट्रॉफी सामना 2019 मध्ये खेळला होता. 2010 ते 2019 या कालावधीत त्याने कर्नाटकसाठी या स्पर्धेत 42 सामने खेळले असून प्रत्येक डावात फलंदाजी केली आहे. या काळात राहुलने 44.97 च्या सरासरीने 1709 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 131 अशी आहे. त्याच्या नावावर चार शतके आणि 11 अर्धशतके नोंदलेली आहेत.
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 साठी कर्नाटकचा संघ :
मयंक अग्रवाल (कर्ंधर), देवदत्त पडिक्कल, करुण नायर (उक्करंधर), आर. स्मरण, केएल श्रीजीथ, अभिनव मनोहर, श्रेयस गोपाल, व्ही. वैशाख, मानवंथ कुमार एल, श्रीशा एस आचार, अभिलाष शेट्टी, शरथ बीआर, हर्षिल धर्मानी, राहुल कृष्णा, ध्रुव कृष्णा, कृष्णा प्रभु
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.