मयंक अगरवालच्या शतकामुळे यॉर्कशायर आघाडीच्या दिशेने

हिंदुस्थानचा अनुभवी फलंदाज मयंक अगरवालने (175) हेडिंग्ले येथे डरहमविरुद्ध यॉर्कशायरसाठी ठोकलेल्या जोरदार शतकाच्या जोरावर संघाने पहिल्या डावात आघाडी मिळवण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे. या काऊंटी हंगामातील यॉर्कशायरचा हा अखेरचा सामना असून रेलिगेशन टाळण्यासाठी त्यांना विजय आवश्यक आहे.

लीड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा हीरो अगरवाल ठरला. यापूर्वीच्या तीन डावांत दोन वेळा शून्यावर बाद झालेल्या अगरवालने या वेळ आक्रमक फलंदाजी केली. त्याने 195 चेंडूंत 20 चौकार आणि 5 षटकारांसह 175 धावा चोपल्या. सलामीवीर ऍडम लिथ (69) याच्यासह त्याने दुसऱ्या विकेटसाठी 127 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. पहिल्या डावात डरहमकडून बेन रेनने 101 धावा केल्या. यॉर्कशायरसाठी जॅक व्हाइटने 69 धावांत 5 विकेट घेतले. लिथने 102 चेंडूंत अर्धशतक झळकावले, तर अगरवालने गफारीला सरळ षटकार मारत 84 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने फटकेबाजी करत फक्त 38 चेंडूंत पुढील पन्नास धावा पूर्ण केल्या.

Comments are closed.