स्प्लिट्सव्हिला 7 मधील प्रसिद्ध स्पर्धक मयंक पवार याचे निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानात रिअॅलिटी शोचा एक चाहता वर्ग आहे. त्यामुळेच शो संपला तरी काही स्पर्धक मात्र मनावर कोरलेले राहतात. ‘स्प्लिट्सव्हिला 7’ मधील प्रसिद्ध स्पर्धक मयंक पवारचे नुकतेच निधन झाले आहे. मयंक पवारच्या निधनाची बातमी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली. मयंक पवार याचे वय मृत्यूसमयी ३७ होते.

निवेदनात म्हटले आहे की, “एक भाऊ, एक चॅम्पियन, एक मार्गदर्शक आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान. मयंक पवार नेहमीच आपल्या हृदयात जिवंत राहील.” ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्याचे फॅन्स आणि फिटनेस क्षेत्रातील मित्रांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

मयांकने लोकप्रिय युवा रिअॅलिटी शो स्प्लिट्सव्हिलाच्या सातव्या सीझन मध्ये भाग घेतला होता. तिथे त्याला कमालीची लोकप्रियता मिळाली. त्याच्या संयमी व्यक्तिमत्त्वामुळे आणि प्रामाणिकपणामुळे शो दरम्यान त्याला प्रशंसा मिळाली. मयंकचे एलिमिनेशन त्या सीझनमधील सर्वात चर्चेत असलेल्या क्षणांपैकी एक बनले. होस्ट सनी लिओनी भावुक झाली होती. व्हिला सोडण्यापूर्वी भावनिक झालेल्या सनीने मयंकला प्रेमाने मिठी मारली. सह-होस्ट निखिल चिनप्पा देखील थांबला आणि त्याला मिठी मारली होती.

रिअॅलिटी टेलिव्हिजनच्या पलीकडे, मयंक पवारची फिटनेस इंडस्ट्रीमध्ये दबदबा होता. सात वेळा मिस्टर इंडियाचा किताब पटकावला होता. तसेच एकदा मिस्टर इंडियाचा किताब जिंकला होता. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम केले होते. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नाही.

Comments are closed.