माझगाव क्रिकेट क्लबला विजेतेपद

गत पराभवाची परतफेड करताना माझगाव क्रिकेट क्लबने मॉर्डन क्रिकेट क्लबचा तीन फलंदाज राखून पराभव करत स्पार्ंटग क्लब कमिटी आयोजित 68 व्या शामराव ठोसर स्मृती क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. जेत्या संघाने प्रतिस्पर्धी संघांनी दिलेले 126 धावांचे आव्हान 27.5 षटकात सात फलंदाजांच्या मोबदल्यात 130 धावांसह पार करत दुसऱयांदा या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले. सेंट्रल मैदानावर खेळल्या गेलेल्या निर्णायक फेरीत उभय संघ चौथ्यांदा समोरासमोर उभे ठाकले होते. त्यात पहिल्या लढतीत माझगाव क्रिकेट क्लब विजयी झाला होता, तर मॉर्डन क्रिकेट क्लबने सलग दोनदा विजय मिळवत यावेळी हॅटट्रिकचा उंबरठा गाठला होता. पण माझगाव क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांनी नियंत्रित मारा करत गटविजेत्यांना 126 धावांवर रोखले होते. अनुराग दिवेकरने 24 धावांत 3, आयुष बदानिया आणि अजय सिंघमने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
Comments are closed.