अर्णव वाणीचे पाच बळी

एमसीएच्या 14 वर्षांखालील मुलांच्या निवड चाचणी तिसऱ्या शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात अर्णव वाणीच्या चतुरस्र गोलंदाजीच्या जोरावर यजमान स्पार्ंटग क्लब कमिटीने दैवज्ञ क्रिकेट क्लबला मर्यादित धावसंख्येवर रोखले. प्रतिस्पर्ध्यांना 148 धावांवर रोखताना अर्णवने 28 धावांत पाच बळी मिळवले. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमानांनी दोन फलंदाजांच्या मोबदल्यात 60 धावांपर्यंत मजल मारली.

प्रथम फलंदाजी करताना नचिकेत मोरे, अथर्व आंब्रे आणि क्रिश बागमर यांनी दैवज्ञ संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. नचिकेतने 45, अथर्वने 31 आणि क्रिशने 28 धावांचे योगदान दिले. अर्णवने 28 धावांत 5, आराध्य कळंबेने तीन आणि चिन्मय देशपांडेने दोन बळी मिळवले. उत्तरादाखल पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमानांनी 2 बाद 60 धावा केल्या. या डावातील दोन्ही बळी वेदांत येल्लावने मिळवले.

संक्षिप्त धावफलक ः दैवज्ञ क्रिकेट क्लब ः (पहिला डाव) ः सर्व बाद 68.3 षटकांत सर्व बाद 148 (नचिकेत मोरे 45, अथर्व आंब्रे 31, क्रिश बागमर 28, अर्णव वाणी 18.3- 10- 28- 5, आराध्य कळंबे 8- 3- 16- 3, चिन्मय देशपांडे 17- 7- 41- 2) विरुद्ध स्पार्ंटग क्लब कमिटी ः (पहिला डाव) ः पहिल्या दिवसअखेर 10 षटकांत 2 बाद 60 (आरुष खंदारे नाबाद 17, विहान अस्वले नाबाद 18, अवांतर 18, वेदांत येल्लाला 5- 3- 17- 2).

Comments are closed.