गुणच दोष ठरतात तेव्हा…
>> डॉ समीरा गुजर-जोशी
निसर्गाच्या रीतींच्या दुष्ट स्वभावामुळे धुरा घातली जाते. काउगर्ल न जन्मलेल्या धान्याच्या खांद्यावर आनंदाने झोपते.
गुणच आपले शत्रू ठरतात जसे की, जो समर्थ आणि कर्तबगार असतो त्यालाच नेहमी जू ला (कामाला) जुंपले जाते आणि ज्याच्या खांद्यावर कधी जू बसलेच नाही तो बैल मात्र गोठ्यात / गल्लीत निवांत झोपतो. ज्याच्यात गुण असतात त्यालाच कामे आणि जबाबदाऱ्या दिल्या जातात; अकार्यक्षम माणूस मात्र निर्धास्त राहतो. (धट्टाकट्टा बैल घाण्याला जुंपला जातो. दुबळा बैल मात्र मस्त शेपटी हलवत सुखाने झोपा काढतो.) अनेकदा समाजात आपले गुण किंवा आपली कार्यक्षमता आपला दोष ठरते. ज्यांच्यात काहीच करण्याची कुवत नाही ते मात्र आयते बसून आपल्या कामाचे लाभ उपभोगतात. त्या परिस्थितीला उद्देशून ही अन्योक्ती आहे.
Comments are closed.