Meena Prabhu Passed Away she is famous for travel Writer


‘माझं लंडन’, ‘इजिप्तायन’, ‘तुर्कनामा’, ‘ग्रीकांजली’ यांसारखी अनेक विविध प्रवासवर्णन लिहिणाऱ्या, कादंबरीकार आणि कवयित्री मीना प्रभू यांचे निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नवी दिल्ली : ‘माझं लंडन’, ‘इजिप्तायन’, ‘तुर्कनामा’, ‘ग्रीकांजली’ यांसारखी अनेक विविध प्रवासवर्णन लिहिणाऱ्या, कादंबरीकार आणि कवयित्री मीना प्रभू यांचे निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या, त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू होते. परंतु, आता त्यांनी प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मराठी साहित्यविश्व एका ज्येष्ठ अशा प्रवासवर्णनकार लेखिकेला मुकलेले आहे. मुळच्या पुण्याच्या असलेल्या मीना प्रभू या विवाहानंतर लंडनमध्ये स्थायिक झाल्या. (Meena Prabhu Passed Away she is famous for travel Writer)

मीना प्रभू या पेशाने भुलतज्ज्ञ होत्या. पण त्या जगभरात प्रवास करत असल्याने त्यांनी प्रवासवर्णन लिहिण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांच्या प्रत्येक प्रवासवर्णनांमधून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. ज्या कारणामुळे त्या प्रवासवर्णनकार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मीना प्रभू यांनी त्यांचे पहिले प्रवासवर्णावरील पुस्तक ‘माझं लंडन’ लिहिले होते. त्यानंतर त्यांनी 12 पेक्षा अधिक प्रवासवर्णने लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी जगातील निरनिराळ्या ठिकाणांची ज्ञान देणारी व रंजन अशी माहिती दिली होती. त्यांची ‘माझं लंडन’, ‘इजिप्तायन,’ ‘तुर्कनामा,’ ‘ग्रीकांजली,’ ‘चिनी माती’ अशी अनेक पुस्तके लोकप्रिय झाली.

हेही वाचा… Sunil Gavaskar : ज्या भारतावर टीका करता त्याच्याच जीवावर तुमची…, इंग्लंडच्या खेळाडूंना गावस्करांनी सुनावले

मीना प्रभू यांनी जगातल्या अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे, त्याची प्रवासवर्णने लिहिली. त्यावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे प्रवासवर्णनांवरील लेख विविध वृत्तपत्रे, मासिके यामध्ये प्रकाशित झाले होते. मीना प्रभू यांनी गोव्यातील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले आहे. तसेच मीना प्रभू यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक-2010, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार-2011, न. चिं. केळकर पुरस्कार-2012, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाले. त्यांनी पुण्यात 2017 मध्ये ‘प्रभू ज्ञानमंदिर’ हा अत्याधुनिक किंडल लायब्ररीचा प्रकल्प सुरू केला होता.



Source link

Comments are closed.