पश्चिम रेल्वेवर आज चार तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल आणि माहिम स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री 12.15 ते रविवारी पहाटे 4.15 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या अवधीत सांताक्रूझ आणि चर्चगेटदरम्यान जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावरून चालवल्या जाणार आहेत. या रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नसेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, 4 मे रोजी वैद्यकीय अभ्यासक्रमाची नीट प्रवेश पूर्व परीक्षा असल्यामुळे मध्य रेल्वेने मेगाब्लॉक रद्द केला आहे. मेन आणि हार्बर अशा दोन्ही लाईनवर ब्लॉक नसेल. नीट परीक्षेला बसणारे विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुरळीत प्रवास करता यावा, यासाठी ब्लॉक रद्द केल्याचे मध्य रेल्वेने शुक्रवारी जाहीर केले.

Comments are closed.