मेगा न्यूक्लियर अणुभट्टी विकसित

चीनच्या आव्हानादरम्यान मोठी झेप : आयएनएस अरिहंतपेक्षा दुप्पट शक्तिशाली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताच्या नौदलाला मोठी भेट मिळणार आहे. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरने (बार्क) 200 मेगावॅट इलेक्ट्रिकचा नवा न्युक्लियर रिअॅक्टर विकसित केला आहे. हा रिअॅक्टर एस5 श्रेणीची आण्विक पाणबुडी आणि न्युक्लियर अटॅक पाणबुडी (प्रोजेक्ट 77) मध्ये वापरण्यात येणार आहे. यामुळे पाणबुडीची क्षमता दुप्पट होणार आहे.

सध्या भारताच्या दोन आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघातमध्ये 86 मेगावॅट इलेक्ट्रिकचा रिअॅक्टर आहे. तिसऱ्या आयएनएस अरिधमनचे परीक्षण सुरू आहे. हे रिअॅक्टर छोटे असल्याने या पाणबुड्या दीर्घकाळापर्यंत पाण्याखाली राहू शकत नाहीत. यामुळे या पाणबुड्यांच्या मोहिमांचा कालावधी कमी होत असतो. परंतु नवा रिअॅक्टर 200 मेगावॅट इलेक्ट्रिकचा असून तो दुप्पट शक्ती प्रदा करणार असल्याने पाणबुडी अधिक काळापर्यंत पाण्याखाली राहू शकणार आहे.

एस5 श्रेणी पाणबुडी : भारताची नवी शक्ती

एस5 श्रेणी भारताच्या नव्या पिढीची बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (एसएसबीएन) आहे. ही अरिहंत श्रेणीपेक्षा दुप्पट मोठी असणार आहे. यात 12-16 आयसीबीएम क्षेपणास्त्रs (के-5 एसएलबीएम, 5000 किमी मारक पल्ला) लावण्यात येणार आहेत. प्रोजेक्ट 77 अटॅक सबमरीन (एसएसएन) शत्रूच्या युद्धनौकांना शिकार करणार आहे. नवा रिअॅक्टर या पाणबुड्यांना मोठा वेग, दीर्घ पल्ला आणि स्टील्थ देणार आहे. हा अपग्रेड चीनच्या वाढत्या सागरी आण्विक शक्तीला प्रत्युत्तर आहे. चीनच्या पाणबुड्यांचा ताफा वेगाने मजबूत होत असल्याने भारतालाही स्वत:ची क्षमता वाढवावी लागली आहे.

अणु व्यापाराचे महत्त्व

भारताच्या न्युक्लियर ट्रायडमध्ये तीन हिस्से असून यात सैन्य (जमिनीवरून डागण्यात येणारी क्षेपणास्त्रs), वायुदल (आकाशातून सोडता येणारा बॉम्ब) आणि नौदल (पाणबुडी) सामील आहे. पाणबुडी हा पर्याय सर्वात सुरक्षित आहे, कारण ही खोल समुद्रात लपून ‘सेकंड स्ट्राइक’ (प्रत्युत्तरादाखल हल्ला) करू शकते. शत्रू याला सहजपणे रोखू शकत नाही. भारत सरकार एस5 आणि प्रोजेक्ट 77 वर लक्ष केंद्रीत करत आहे, जेणेकरून भारताची आण्विक शक्ती मजबूत होईल.

बार्कच्या आणखी योजना

बार्क 200 मेगावॅट इलेक्ट्रिकचा लाइट-वॉटर आधारित भारत स्मॉल मॉड्यूलर रिअॅक्टर (एसएमआर) डिझाइन करत आहे. याचबरोबर 555 मेगावॅट इलेक्ट्रिक एसएमआर आणि हाय टेम्परेचर गॅस कूल्ड रिअॅक्टर (क्लीन हायड्रोजन उत्पादनासाठी) तयार करणार आहे. हे प्रकल्प नागरी ऊर्जेसाठी असून ते भारताला ऊर्जा आत्मनिर्भर करतील असे बार्कचे अध्यक्ष ए.के. मोहंती यांनी व्हिएन्ना येथे आयएईए परिषदेत बोलताना सांगितले आहे.

Comments are closed.