Meghalaya honeymoon murder case : बायकोनेच दिली होती नवऱ्याची सुपारी, सोनमसह चार जण अटकेत

Meghalaya honeymoon murder case : बायकोनेच दिली होती नवऱ्याची सुपारी, सोनमसह चार जण अटकेत

गुन्हेगारीच्या बातम्या: मेघालयातील शिलाँग येथे राजा रघुवंशी यांच्या हनिमून दरम्यान झालेल्या संशयास्पद हत्येप्रकरणी, त्यांची पत्नी सोनम रघुवंशी आज (9 जून) उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातून सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनमने रविवार-सोमवारच्या मध्यरात्री मध्य प्रदेशातील इंदूर येथील तिच्या कुटुंबातील सदस्यांना फोन केला.  फोन येताच, इंदूर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि त्यांनी यूपी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर गाजीपूर पोलिसांनी त्याला एका ढाब्यावरून शोधून काढले. इंदूरमधील एक जोडपं 11 मे 2025 रोजी लग्न केल्यानंतर हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. हे दोघं 20 मे रोजी मेघालयात पोहोचले आणि 23 मे रोजी त्यांनी शेवटचं आपल्या कुटुंबाशी बोलणं केलं. त्यानंतर दोघांचेही मोबाईल बंद आले.आता या प्रकरणात सोनम रघुवंशीचा एक सीसीटीव्ही व्हायरल होत आहे. (Sonam Raghuwanshi)

सोनम रघुवंशीचा CCTV व्हायरल

दरम्यान, सोनम रघुवंशीचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सोनम तिचा पती राजासोबत स्कूटी बुक करण्यासाठी गेली आहे. जेव्हा राजा स्कूटीवर बसतो आणि त्याची पत्नी सोनमला त्याचे हेल्मेट धरायला बोलावतो तेव्हा सोनम मागे जाते आणि तिच्या मोबाईल फोनवर वेगाने काहीतरी टाइप करताना दिसते. व्हिडिओ पाहिल्यानंतर, ती कोणालातरी गुप्त संदेश पाठवत असल्याचा संशय वाढत आहे. सोशल मीडियावर, त्याचा संबंध हत्येशी जोडला जात आहे.

Comments are closed.