Video कानाखाली मारेन, बडतर्फ करेन; भर सभेत मंत्री मेघना बोर्डीकर यांची ग्रामसेवकाला धमकी

आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भर कार्यक्रमात एका ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ शेअर करताच बोर्डीकर यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कार्यक्रमात एका प्रकरणाचा जाब विचारताना बोर्डिकर यांनी ग्रामसेवकाला ही धमकी दिली. “अशा प्रकारं कुणाचं काम केलं ना तर याद राख, हे मेघना बोर्डीकरचे शब्द आहेत. कानाखाली मारीन. आताच्या आता बडतर्फ करेन. कोणाची चमचेगिरी करायची नाही, तु काय कारभार करतो हे मला माहित नाही का? मी मुद्दामून सीईओ मॅडमला इथे घेऊन आले आहे. हमाली करायची असेल तर सोडून दे नोकरी”, अशा शब्दात मेघना बोर्डीकर यांनी भर सभेत त्या ग्रामसेवकाला सुनावले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मेघना बोर्डीकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
Comments are closed.