Members Premier League – पाय्याडे स्पोर्ट्स क्लबने उंचावला विजेतेपदाचा करंडक
कांदिवली येथील सचिन तेंडुलकर जिमखाना येथे पार पडलेल्या ‘मेंबर्स प्रीमियर लीग’ (MPL) क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाय्याडे स्पोर्ट्स क्लबने श्रीजी स्ट्रायकर्सवर ५ गडी राखून मात करत विजेतेपदाला गवसणी घातली. प्रथम फलंदाजी करताना श्रीजी स्ट्रायकर्सने ६ षटकांत ५ बाद ७९ धावांचे आव्हान उभे केले होते, ज्यामध्ये उत्तुंग ठाकूरने १३ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात पाय्याडे स्पोर्ट्स क्लबने दिशांत देडियाच्या १० चेंडूतील झंझावाती ३३ धावांच्या जोरावर अवघ्या ५.२ षटकांत लक्ष्य पूर्ण करून दिमाखात विजय मिळवला.
महिलांच्या गटात मात्र श्रीजी स्ट्रायकर्सने वर्चस्व गाजवत ‘उर्वी होमग्राउंड’ संघाचा ६२ धावांनी धुव्वा उडवला. क्षमा पाटेकरच्या २० चेंडूतील ६८ धावांच्या जोरावर श्रीजी स्ट्रायकर्सने ६ षटकांत १५१ धावांचा डोंगर उभारला होता. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना उर्वी होमग्राउंडचा संघ ४ बाद ८९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून पौर्णिमा पांडागळेने १६ चेंडूत ५६ धावा केल्या. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि अपेक्स कौन्सिल सदस्य भूषण पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले.
Comments are closed.