शिवनेरी, सरस्वती, विद्यार्थीची विजयी घोडदौड

लालबागच्या ओम साई ईश्वर सेवा मंडळ आयोजित पुरुष आणि महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत  शिवनेरी, सरस्वती कन्या, विद्यार्थी आणि ओम समर्थ या संघांनी विजयी सुरुवात केली. पेरू कंपाऊंडमध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनीय सामन्यात महिला गटामध्ये शिवनेरी सेवा मंडळाने वैभव स्पोर्ट्स क्लबवर 12-8 असा चार गुणांनी विजय मिळवला. शिवनेरी सेवा मंडळच्या आयुषी गुप्ताने अष्टपैलू खेळ केला. त्यांच्याच  मुस्कान शेखने  सुंदर साथ दिली, वैभव स्पोर्ट्स क्लबच्या अवंतिका आंबोकर व सलोनी सावंत यांनी सुंदर खेळी करत त्यांना उत्तम लढत दिली, मात्र त्या आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत.महिला गटाच्या दुसऱया लढतीत सरस्वती कन्या संघाने श्री समर्थ राम मंदिर दादरवर 7-6 अशी एक डाव एक गुणाने एकतर्फी लढत जिंकली.

Comments are closed.