भारतीय तरुणांमध्ये मानसिक आजार वाढत आहेत.

युवांमध्ये मानसिक आजार वेगाने वाढत आहेत. भारतात सुमारे 5.4 कोटी युवा आणि दक्षिणपूर्व आशियाच्या देशांमध्ये 2.8 कोटीहून अधिक युवा कुठल्या न कुठल्या मानसिक समस्येला सामोरे जात आहेत. जर वेळीच याकडे लक्ष न दिल्यास आगामी वर्षांमध्ये याचा प्रभाव केवळ युवांचे आरोग्य नव्हे तर शिक्षण, रोजगार आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणार असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.

ईयू-एशियन यूथ मेंटल हेल्थ कॉन्फरन्सच्या नव्या अहवालानुसार 1990 च्या तुलनेत 2021 पर्यंत दक्षिणपूर्व आशियाई देशांमधील युवांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण 44 टक्क्यांनी वाढले आहे. येथे 15-34 वयोगटातील 2.8 कोटीहून अधिक युवा मानसिक विकारांसोबत जीवन जगत आहेत. हे क्षेत्रात मानसिक आजारांच्या एकूण प्रकरणांच्या सुमारे 36 टक्के आहे.

भारतातील आकडेवारी चिंताजनक

अहवालानुसार भारतात 15-24 वयोगटातील जवळपास 5.4 कोटी युवा कुठल्या न कुठल्या मानसिक समस्येने प्रभावित आहेत. 1990 नंतर सर्वात वेगवान वाढ 25-34 वयोगटात झाली आहे. म्हणजेच नोकरी, परिवार आणि कारकीर्दीच्या जबाबदाऱ्यांचे वय सर्वाधिक प्रभावित होत आहे. युवांमध्ये चिंता (एंक्झाइटी) सर्वात सामान्य मानसिक समस्या ठरली आहे. दर 100 युवांमध्ये जवळपास 5 यामुळे प्रभावित आहेत. यानंतर नैराश्य, नशेची सवय आणि अन्य मानसिक आजारांची प्रकरणेही वेगाने वाढत आहेत. महिलांमध्ये मानसिक आजारांची प्रकरणे पुरुषांच्या तुलनेत अधिक आढळून आली आहेत.

सोशल मीडियाही ठरले कारण

शिक्षण अन् कारकीर्दीची प्रतिस्पर्धा, नोकरीची अनिश्चितता, आर्थिक दबाव ही तणावाची कारणे होतीच, आता सोशल मीडिया एकाकीपणा, नैसर्गिक आपत्ती आणि सामाजिक तणाव युवांच्या मानसिक आरोग्याला प्रभावित करत आहेत. लोक आजही मानसिक आजाराला लपवितात, ज्यामुळे वेळीच उपचार मिळू शकत नाहीत. मानसिक आरोग्य सेवांना केवळ मोठ्या रुग्णालयांपर्यंत मर्यादित ठेवण्याऐवजी शाळा, कॉलेज आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचवाव्या लागतील असे अहवालात म्हटले गेले आहे.

Comments are closed.