मतिमंद महिलेवर बलात्कार, आरोपी रफिकुल चकमकीत जखमी

वृत्तसंस्था/ कोक्राझार

आसामच्या कोक्राझारमध्ये मनोरुग्ण महिलेवर बलात्कार प्रकरणाचा आरोपी पोलिसांसोबतच्या चकमकीत जखमी झाला आहे. या आरोपीचे नाव रफीकुल इस्लाम असून त्याने रविवारी कथित स्वरुपात कोठडीतून पलायनाचा प्रयत्न केला होता. रफीकुलला रोखण्यासाठी पोलिसांनी झाडलेली गोळी त्याच्या पायाला लागला आहे. या चकमकीदरम्यान दोन पोलीसही जखमी झाले आहेत.

रफीकुलला कोक्राझार येथे नेण्यात येत असताना त्याने लघुशंकेसाठी वाहन रोखण्यास लावले. यादरम्यान त्याने सोबतच्या पोलिसांकडील शस्त्रास्त्रs हिसकावून घेत पलायनाचा प्रयत्न तसेच हल्ला केला. यानंतर पोलिसांनी त्याला रोखण्यासाठी गोळी झाडल्याने तो जखमी झाला आहे. जखमी रफीकुलला कोक्राझार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोक्राझारमध्ये तणाव

पथारुघाटनजीक लेबर कॅम्पमध्ये एका मनोरुग्ण महिलेवर रफीकुलने बलात्कार केला होता. या घटनेमुळे पूर्ण भागात संतापाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात निदर्शनेही झाली आहेत. रानीघुली भागात स्थिती तणावपूर्ण राहिली असून वर्ल्ड हिंदू फेडरेशनच्या कोक्राझार जिल्हा समितीकडून बंदच्या आव्हानानंतर तणाव आणखी वाढला. तर कायदा-सुव्यवस्थेची स्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने हिंसा वाढण्यापासून रोखण्यासाठी जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.

Comments are closed.