आंतरराष्ट्रीय ताफ्याद्वारे 'वसुधैव कुटुंबकम'चा संदेश
समुद्रात युद्धनौका, आकाशात गर्जना करणारी लढाऊ विमाने
वृत्तसंस्था/ शाखापट्टणम
18 देशांच्या 19 युद्धनौका, भारताच्या 50 हून अधिक युद्धनौका आणि आकाशात हेलिकॉप्टर्स तसेच लढाऊ विमानांची गर्जना अशाप्रकारचे दृश्य इंटरनॅशनल फ्लीट रिह्यू निमित्त आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावर पहायला मिळाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इंटरनॅशनल फ्लीट रिह्यूमध्ये सामील सर्व युद्धनौकांचे निरीक्षण केले आणि त्यांच्या कमांडर्सकडून मानवंदना स्वीकारली आहे. इंटरनॅशनल फ्लीट रिह्यूच्या या आकर्षक परंपरेने सागरी शांततेबद्दल भारताच्या प्रतिबद्धतेला व्यक्त केले आहे.
मजबूत सागरी व्यवस्था, समान विचार असलेल्या भागीदारांदरम्यान मिळून जबाबदारी आणि मिळून काम करण्यावर आधारित असते असे भारताचे मानणे असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. इंटरनॅशनल फ्लीट रिह्यू 2026 मध्ये 70 हून अधिक देशांच्या नौदल सामील झाले आहे.
इंटरनॅशनल फ्लीट रिह्यू सागरी परंपरांसाठी देशांदरम्यान एकता, विश्वास आणि सन्मान दाखवितो. वेगवेगळे ध्वज असलेल्या युद्धनौका आणि विविध देशांच्या खलाशांनी या कार्यक्रमात एकजुटतेची भावना दाखविली आहे. एकजुटतेची ही भावना या रिह्यूची थीम ‘युनायटेड थ्रू ओशन्स’मध्ये चांगल्याप्रकारे दाखविण्यात आली आहे. या एकत्र आलेल्या नौदलांच्या शक्तीची प्रतिबद्धता आणि निर्धार कुठल्याही आव्हानाला पेलू शकतो हा सकारात्मक संदेश यातून जागतिक समुदायाला मिळणार असल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी काढले आहेत.
सागरी भागासमवेत आंतरराष्ट्रीय संबंधांवरून भारताचा दृष्टीकोन ‘वसुधैव कुटुंबकम’च्या आमच्या विचाराने मार्गदर्शित आहे. हा दृष्टीकोन जागतिक सुरक्षा आणि विकास, शाश्वतता आणि स्थिरतायुक्त भागीदारीने निर्माण होतो. भागीदारीची ही भावना एका दीर्घकाळापर्यंत चालणाऱ्या जागतिक व्यवस्थेचा पाया आहे. हा फ्लीट रिह्यू भारताच्या ‘महासागर’ व्हिजनलाही पुढे नेणारा आहे, ज्याचा अर्थ सर्व भागांमध्ये सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर सहकार्यासाठी काम क्हावे असा असल्याचे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.
भारतीय नौदल भारताच्या सागरी हितांची सुरक्षा करणे आणि मोठ्या सागरी भागांमध्ये स्थिरतेकरता योगदान देण्यासाठी सतर्क आहे. या भागात तैनात भारतीय नौदलाच्या युनिट्स समुद्रात निर्माण होणारे धोके आणि आव्हानांपासून बचावाच्या सर्वात विश्वसनीय पद्धतीच्या स्वरुपात काम करतात. भारतीय नौदल अनेकदा मानवीय संकट आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळातही फर्स्ट रिस्पॉन्डर्स ठरले आहे. भारतीय नौदल जगभरातील नौदलांसोबत सद्भावना वाढविणे आणि विश्वास, आत्मविश्वास आणि मैत्रीचा सेतू निर्माण करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे वक्तव्य राष्ट्रपतींनी केले आहे. यंदा 18 देशांच्या 19 युद्धनौकांनी या फ्लीट रिह्यूत भाग घेतला आहे.
फ्लीट रिह्यूत सामील देश
सेशेल्स, इंडोनेशिया, मालदीव, थायलंड, ओमान, इराण, रिपब्लिक ऑफ कोरिया, ऑस्ट्रेलिया, जपान, म्यानमार, व्हिएतनाम, संयुक्त अरब अमिरात, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, रशिया, बांगलादेश, श्ा़dरीलंका.
सर्वात मोठे आकर्षणाचे केंद्र
या फ्लीट रिह्यूमध्ये सर्वात मोठे आकर्षणाचे केंद्र भारताची स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत राहिली. याचबरोबर 50 हून अधिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्सनी फ्लाय-पास्ट करत राष्ट्रपतींना मानवंदना दिली आहे. आकाशात मिग-29के, एलसीए तेजस, पी-8आय टेहळणी विमान आणि सी-किंग हेलिकॉप्टर्सची गर्जना ऐकू आली. जगातील सर्वात घातक सागरी कमांडोंमध्ये सामील नौदलाच्या मार्कोसनी देखील स्वत:च्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
Comments are closed.