मीटर कनेक्शनसाठी सवा लाख मागितले; महावितरणच्या लाचखोर कर्मचाऱ्यावर झडप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवीन वीजमीटर बसवून देण्यासाठी चक्क सवा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यासह एक दलालाला एसीबीने रंगेहाथ पकडले. सुरुवातीला एक लाख ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीनंतर १ लाख २५ हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. महावितरण कर्मचारी जयंत शिवकर (५१) आणि दर्शन साळवी अशी आरोपींची नावे आहेत..

कोपरीत तक्रारदाराचा बांधकाम व्यवसाय सुरू आहे. तात्पुरते नवीन वीजमीटर बसविण्यासाठी शिवकर आणि साळवी यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली. एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचला असता १ लाख २५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.