मुलुंडमध्ये मेट्रोचा खांब चालती कार आणि रिक्षावर कोसळला; 1 ठार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुलुंड पश्चिम येथे शनिवारी दुपारी चालती रिक्षा आणि कारवर मेट्रोचा अवाढव्य खांब कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रामधन यादव असे मृताचे नाव आहे. या दुर्घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. एलबीएस मार्गावर ‘एमएमआरडीए’कडून मेट्रो-4 मार्गिकेचे काम सुरू असून निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे.

कंत्राटदाराला पाच कोटींचा दंड, पाच जणांना अटक

अपघातप्रकरणी मुलुंड पोलिसांनी मिलन रोड बिल्डटेक आणि डीबी हिल एलपीजी सुपरवायझरी कंपनीच्या व्यवस्थापक, अभियंते, सुपरवायझर आणि कामगारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मीलन रोड बिल्डटेकचे  प्रोजेक्ट डायरेक्टर हरीष चौहान, प्रोजेक्ट व्यवस्थापक कुलदीप सपकाळ, उपव्यवस्थापक सौरभ सिंग, सुपरवायझर प्रशांत भोईर आणि डीबी हिल एलबीजीचा प्रोजेक्ट व्यवस्थापक अवधूत इनामदार अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. निष्काळजीपणाबद्दल कंत्राटदाराला एमएमआरडीएने पाच कोटींचा दंड ठोठावला आहे.

Comments are closed.