म्हाडाच्या 5,285 घरांच्या सोडतीला मुदतवाढ; 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार, 9 ऑक्टोबरला संगणकीय सोडत

म्हाडाच्या कोकण मंडळाने 5,285 घरांच्या आणि सिंधुदुर्गातील ओरोस व कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंडांच्या विक्रीकरिता आयोजित सोडतीला दुसऱयांदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार इच्छुकांना आता 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार असून 9 ऑक्टोबरला ठाण्यात सोडत काढण्यात येईल.
कोकण मंडळाच्या या सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 565 घरे, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 घरे, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेली 1677 घरे आणि म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत 41 घरे तसेच 77 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
रेकॉर्डब्रेक अर्ज
कोकण मंडळाच्या यंदाच्या सोडतीला रेकॉर्डब्रेक म्हणजेच मुंबईतील घरांच्या तोडीचे अर्ज आले आहेत? या सोडतीसाठी गुरुवारी 6.30 वाजेपर्यंत 1,52,205 अर्ज आले असून 1,19,038 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत? मुदतवाढ दिल्यामुळे अर्जदारांच्या संख्येत मोठी वाढ होईल?
नवीन वेळापत्रकानुसार, या सोडतीसाठी 12 सप्टेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज तर 13 सप्टेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा करता येणार आहे. सोडतीसाठी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्जदारांनी अर्ज करावा, असे आवाहन कोकण मंडळातर्फे करण्यात आले आहे.
Comments are closed.