MHADA Lottery 2024 extension of application deadline by Konkan Mandal PPK


म्हाडा कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 2264 सदनिकांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या घरांसाठी 26 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार होते. परंतु, आता या अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढ करण्याचा निर्णय कोकण महामंडळाकडून घेण्यात आला आहे.

मुंबई : म्हाडा कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 2264 सदनिकांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 11 ऑक्टोबर, 2024 ला सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे या घरांसाठी 26 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार होते. परंतु, आता या अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढ करण्याचा निर्णय कोकण महामंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार, अर्जदार या सोडतीसाठी 6 जानेवारी 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली. त्यामुळे मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आणखी एक संधी मिळाली आहे. (MHADA Lottery 2024 extension of application deadline by Konkan Mandal)

कोकण महामंडळाने जाहीर केलेल्या दोन हजार 264 घरांच्या सोडतीसाठी अर्जदार आता 06 जानेवारी, 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. तर, 07 जानेवारी, 2025 रोजी रात्री 11.59 पर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील, तसेच दिनांक 07 जानेवारी, 2025 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी 20 जानेवारी, 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तर, 22 जानेवारी, 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. 24 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता सोडतीत सहभाग घेणार्‍या अर्जांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

– Advertisement –

हेही वाचा… BMC : रस्‍त्‍यावरील 10 हजार खाद्यविक्रेत्यांना मिळणार अन्न सुरक्षा आणि स्वच्छ्तेचे धडे

सोडत कधी निघणार?

म्हाडा कोकण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 10 वाजता पात्र अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाइलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर प्राप्त होणार आहे. या सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 594 सदनिका, 15 टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 825 सदनिका, कोकण मंडळाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत विखुरलेल्या 728 सदनिका, रोहा-रायगड व ओरस सिंधुदुर्ग येथे 117 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

– Advertisement –

मुदत वाढ का?

म्हाडाच्या दोन हजार 264 घरांसाठी सोमवारी, 23 डिसेंबरला 23 हजार 551 इच्छुकांनी अर्ज भरले. तर यापैकी केवळ 13 हजार 728 अर्जदारांनी अनामत रक्कमेचा भरणा केला आहे. प्रत्यक्ष सोडतीसाठी आतापर्यंत केवळ 13 हजार 728 अर्ज आले असून ही संख्या बरीच कमी आहे. त्यामुळे मुंबईतील 2264 घरांसाठी म्हाडाकडून दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.


Edited By Poonam Khadtale



Source link

Comments are closed.