उपकरप्राप्त इमारतींचे म्हाडा करणार स्ट्रक्चरल ऑडिट, पहिल्या टप्प्यात 500 इमारती निश्चित केल्या
जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागावा म्हणून म्हाडाने आता स्वतःच उपकर प्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 500 इमारती निश्चित केल्या आहेत.
सध्या मुंबईत सुमारे 13 हजार उपकरप्राप्त जुन्या इमारती आहेत. त्यांची दुरुस्ती म्हाडाकडून केली जाते. त्यापैकी अनेक इमारती दुरुस्तीच्या पलिकडे गेल्या आहेत. जुन्या इमारतीचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी धोकादायक इमारती पालिका आणि म्हाडाच्या पॅनलवर असलेल्या संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून निश्चित केल्या जाणार आहेत.
z स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये म्हाडाला एखादी इमारत सी-1 म्हणजेच अतिधोकादायक आढळल्यास संबंधित इमारतीच्या मालकाला सहा महिन्यांत पुनर्विकास प्रस्ताव सादर करण्याबाबत नोटीस दिली जाईल, त्याने प्रस्ताव न दिल्यास रहिवाशांना प्रस्ताव सादर करण्याची संधी दिली जाईल. तर सी-2अ आणि सी-3मध्ये आल्यास इमारतीची दुरुस्ती केली जाईल.
Comments are closed.