म्हाडाच्या 149 दुकानांचा आज लिलाव, गोरेगावातील साडेबारा कोटींच्या दुकानाचे काय होणार?

म्हाडाच्या मुंबईतील दुकानांचा गुरुवारी लिलाव करण्यात येणार आहे. 149 दुकानांसाठी अनामत रकमेसह 454 अर्ज आले आहेत. म्हाडाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जादा बोली लावणाऱ्या अर्जदाराला दुकान मिळणार आहे. गेल्या लिलावात विक्री न झालेल्या गोरेगावच्या बिंबिसार नगरमधील दुकानाचादेखील यंदाच्या लिलावात समावेश आहे. या दुकानाची बेस प्राईज गेल्या लिलावात 13 कोटी 93 लाख रुपये होती. यंदा या दुकानाची बेस प्राईज 12 कोटी 63 लाख रुपये ठेवली आहे. त्यामुळे यंदा तरी या महागड्या दुकानाची विक्री होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
दुकानांच्या लिलावात मुलुंड गव्हाणपाडा येथे 6 दुकान, कुर्ला-चुनाभट्टी स्वदेशी मिल येथे 5, तुंगा पवई येथे 2, कोपरी पवई येथे 23, चारकोप येथे 23, जुने मागाठाणे बोरिवली पूर्व येथे 6, महावीर नगर कांदिवली पश्चिम येथे 6, प्रतीक्षा नगर येथे 9, अॅण्टॉप हिल वडाळा येथे 3, मालवणी मालाड येथे 46, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व येथे 17 व गोरेगावच्या शास्त्री नगर, सिद्धार्थ नगर तसेच जोगेश्वरीच्या मजासवाडी येथे प्रत्येकी 1 दुकान विक्रीसाठी उपलब्ध आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता https://eauction.mhada.gov.inJe https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या लिलावात मालवणी आणि बिंबिसार नगरमधील दुकानांकडे अर्जदारांनी पाठ फिरवली होती.
Comments are closed.