टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कोणते दोन संघ पोहोचणार? मायकल क्लार्कची मोठी भविष्यवाणी

मायकेल क्लार्कने ICC T20 विश्वचषक 2026 वर विधान केले नवी दिल्ली : आयसीसी टी 20 वर्ल्ड कपची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्याकडून टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जात आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कनं मोठं वक्तव्य केलं आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कोण खेळणार? आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचमध्ये काय घडणार याबाबत देखील मायकल क्लार्कनं भविष्यवाणी केली आहे. भारताचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला होणार आहे. तर, भारत आणि पाकिस्तान मॅच 15  फेब्रुवारीला होणार आहे.

फायनलमध्ये कोणते संघ खेळणार?

मायकल क्लार्क यानं अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होईल, असं म्हटलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आमने सामने आले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला होता. भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं देखील फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ समोर असावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

भारताच्या गटात पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँडस आणि नामिबियाचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या गटात श्रीलंका, झिम्बॉब्वे, आयरलँड आणि ओमानचा समावेश आहे.

भारत पाक सामन्यावर क्लार्क काय म्हणाला?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना प्रत्येक क्रिकेट रसिकाला पाहायचा असतो. भारतानं दीर्घकाळापासून या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानला पराभूत केलेलं आहे. पाकिस्तान विजयाच्या जवळ पोहोचेलं नाही. पाकिस्तानला भारताविरुद्ध खेळण्याचा दबाव कसा हाताळायचा हे शिकावं लागेल, असं क्लार्क म्हणाला.

भारतानं टी 20 वर्ल्ड कप दोन वेळा जिंकला आहे. पहिला टी 20 वर्ल्ड कप भारतानं महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात 2207 मध्ये जिंकला होता. तर, रोहित शर्मानं 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कप भारताला जिंकवून दिला होता. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारताला तिसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. विशेष बाब म्हणजे भारतानं मायदेशात टी 20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही.

आणखी वाचा

Comments are closed.