मायकल जॅक्सनच्या बायोपिकचा विक्रम!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मायकल जॅक्सनच्या आयुष्यावर आधारित ‘मायकल’ नावाचा बायोपिक 24 एप्रिलला जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच आठवडय़ात जगभरात सुमारे 314 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2,600 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर विक्रम केला आहे.

‘मायकल’ या चित्रपटात मायकल जॅक्सनची भूमिका त्याचा पुतण्या जाफर जॅक्सन याने साकारली आहे. त्याचा मायकल जॅक्सनसारखा हुबेहूब दिसणारा लूक आणि त्याच ताकदीचा डान्स पाहून जगभरातील चाहते थक्क झाले आहेत. चित्रपटामुळे मायकल जॅक्सनची गाणी पुन्हा एकदा लोकप्रिय झाली आहेत. या चित्रपटामुळे तरुणांमध्ये मायकलच्या डान्स स्टेप्सचे ‘चॅलेंजेस’ ट्रेंड होत आहेत. या चित्रपटामुळे ‘किंग ऑफ पॉप’ची जादू आजही कायम असल्याचे दिसतेय.

Comments are closed.