अंदाधुंद गोळीबार, रेस्टॉरंटमध्ये लपला म्हणून क्रिकेटपटू वाचला, ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत समुद्रकि
मायकेल वॉन सिडनी दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या : ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरालगतच्या बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला आणि 42 जण जखमी झाले. बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर ज्यू नागरिक सण साजरा करत असताना दोन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या नागरिकांमध्ये पळापळ सुरु झाली. मात्र काही वेळानं पोलिसांनी एका हल्लेखोराला गोळ्या घातल्या. तर दुसरा हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे.
अंदाधुंद गोळीबार, रेस्टॉरंटमध्ये लपला म्हणून क्रिकेटपटू वाचला (Sydney Terrorist Attack Michael Vaughan News)
दरम्यान, या अंदाधुंद गोळीबारत थोडक्यात बचावलेले इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांचे शब्द त्या थरारक क्षणांचं भयावह वास्तव मांडण्यासाठी पुरेसे आहेत. हल्ल्याच्या वेळी मायकेल वॉन बॉन्डी बीच परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये उपस्थित होते. अचानक गोळीबाराचे आवाज लागल्यानंतर संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला.
बोंडी येथील रेस्टॉरंटमध्ये बंद असणे भितीदायक होते.. आता घर सुरक्षित आहे.. पण आपत्कालीन सेवा आणि दहशतवादाचा सामना करणाऱ्या व्यक्तीचे मनापासून आभार.. प्रभावित झालेल्या सर्वांचे विचार.. xxx
— मायकेल वॉन (@MichaelVaughan) 14 डिसेंबर 2025
वॉन यांनी सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर करत लिहिलं, “बॉन्डीमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये लॉक होणं अत्यंत भीतीदायक होतं. सुदैवाने मी आता सुरक्षित घरी पोहोचलो आहे. आपत्कालीन सेवांचे आणि त्या धाडसी व्यक्तीचे आभार, ज्याने दहशतवाद्याचा सामना केला. वॉन यांची ही प्रतिक्रिया त्या क्षणांतील दहशतीची साक्ष देणारी आहे, ज्यात असंख्य नागरिक आणि पर्यटक अडकले होते. वॉन यांनी ज्या धाडसी व्यक्तीचे आभार मानले, त्याच्या शौर्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती शूटरला मागून पकडताना, त्याच्या हातातून बंदूक हिसकावून घेताना स्पष्ट दिसतो.
हा माणूस हिरो आहे pic.twitter.com/y8lbPU3qPp
— भाई साहेब (@भाई_साहेब) 14 डिसेंबर 2025
ऑस्ट्रेलियन पोलिसांनी ही घटना दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट केलं आहे. न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर क्रिस मिन्स यांनी सांगितलं की, हा हल्ला थेट सिडनीतील यहूदी समुदायाला टार्गेट करून करण्यात आला आहे. घटनास्थळावरून एक वाहन जप्त करण्यात आलं असून, त्यामध्ये इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइस (IED) असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे बॉम्बनिरोधक पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी दोन हल्लेखोरांची ओळख पटवली असून, तिसऱ्या संशयिताच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे. नागरिकांनी संयम राखावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कार्यक्रमस्थळी एक हजाराहून अधिक लोक उपस्थित होते.
ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत समुद्रकिनाऱ्यावर मृतदेहांचा खच! (Sydney Terrorist Attack Marathi News)
दरम्यान, रविवारी ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दाखवलेल्या हवाई दृश्यांमध्ये बॉन्डी बीचवर झाकलेले मृतदेहांचा खच, जखमींवर उपचार करत असलेले आपत्कालीन कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणावर तैनात असलेला पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला. पंतप्रधान अँथनी अल्बनीझ यांनी या घटनेला धक्कादायक आणि अत्यंत वेदनादायक असं संबोधत, लोकांचे प्राण वाचवणं आणि सुरक्षितता सुनिश्चित करणं हीच सध्या सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं सांगितलं.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.