Sydney Mass Shooting – रेस्टॉरंटमध्ये लपून प्रसिद्ध क्रिकेटपटूने वाचवले प्राण

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील बॉन्डी बीचवर दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याच्या वेळी इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन देखील या बीचवर होता. त्याने एका रेस्टॉरंटमध्ये लपून स्वत:चे प्राण वाचवले. वॉन याने ट्विटरवर याबाबत पोस्ट टाकत माहिती दिली.
बोंडी येथील रेस्टॉरंटमध्ये बंद असणे भितीदायक होते.. आता घर सुरक्षित आहे.. पण आपत्कालीन सेवा आणि दहशतवादाचा सामना करणाऱ्या व्यक्तीचे मनापासून आभार.. प्रभावित झालेल्या सर्वांचे विचार.. xxx
— मायकेल वॉन (@MichaelVaughan) 14 डिसेंबर 2025
”हल्ल्यानंतर मी बॉन्डी बीचवरच्या एका रेस्टॉरंटमध्ये लपून बसलो होतो. सुदैवाने मी आता सुरक्षित घरी पोहोचलो आहे. आपत्कालीन सेवांचे आणि त्या धाडसी व्यक्तीचे आभार, ज्याने दहशतवाद्याचा सामना केला”, असे वॉनने ट्विट केले आहे.
समोर मृत्यूचे तांडव आणि तो दहशतवाद्याला भिडला
दहशतवादी बेछूट गोळीबार करत असताना अहमद अल अहमद नावाच्या व्यक्तीने कारच्या मागे लपून संधी साधत जिवावर उदार होत दहशतवाद्यावर झडप घातली आणि दहशतवाद्याच्या हातातून रायफल हिसकावून घेतली. त्यांना रायफल चालवता येत नाही. त्यामुळे त्यांनी दहशतवाद्याकडे ती रोखून धरली. मात्र त्याच वेळी दुसऱ्या दहशतवाद्याने त्यांच्यावर पाठीमागून गोळी मारली. त्यात अहमद हे जखमी झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
29 वर्षांनी ऑस्ट्रेलियात मास शूटिंग
ऑस्ट्रेलियात अशा मास शूटिंगच्या घटना क्वचित घडतात. यापूर्वी 1996मध्ये पोर्ट आर्थर येथे एका जणाने गोळीबार केला होता. त्यात 35 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एप्रिल 2024मध्ये एकाने चाकूने हल्ला केला होता. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. या हल्लेखोराला गोळी घालून ठार करण्यात आले होते.

Comments are closed.