दक्षिण आफ्रिकेने मुद्दाम हरायला हवे होते, वॉनने तोडले ‘अकलेचे तारे’
टी-20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानने ऐतिहासिक जेतेपद पटकावल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने केलेले वक्तव्य क्रिकेटविश्वात तीव्र संतापाचे कारण ठरले आहे. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजविरुद्ध मुद्दाम पराभव पत्करला असता तर हिंदुस्थान उपांत्य फेरीत पोहोचला नसता, असे विधान करत वॉनने अकलेचे तारे तोडले आहेत.
एका क्रिकेट पॉडकास्टमध्ये बोलताना वॉनने दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतील ‘सर्वात मूर्ख संघ’ असे संबोधले. त्यांनी सुपर-8 टप्प्यात वेस्ट इंडीजला जिंकू दिले असते तर हिंदुस्थान स्पर्धेबाहेर गेला असता, असा दावा त्याने केला. वॉनच्या मते मजबूत संघाला बाहेर काढणे हे स्पर्धा जिंकण्याचे तंत्र असते आणि दक्षिण आफ्रिकेने ती संधी दवडली.
हिंदुस्थानची विजयी घोडदौड
दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजला हरवल्यानंतर हिंदुस्थानचा आत्मविश्वास अधिक वाढला आणि संघाने झिम्बाब्वे, वेस्ट इंडीज आणि इंग्लंडवर मात करत विजेतेपद पटकावले, असेही वॉन म्हणाला. मात्र हिंदुस्थानच्या दमदार कामगिरीचे श्रेय कमी लेखण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका केली आहे.
Comments are closed.