36 तासांनी मायक्रोसॉफ्ट पूर्ववत
अमेरिकेसह जगाच्या तोंडचे पाणी पळवणारा मायक्रोसॉफ्ट 365 सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला आहे. त्यामुळे तब्बल 36 तासांनंतर आऊटलुक, टीम्स आणि को-पायलटसारख्या सेवा पूर्ववत झाल्या आहेत. मायक्रोसॉफ्टने ‘एक्स’ पोस्ट करून आज ही माहिती दिली.
हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी सकाळी मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे युजर्सना ऑनलाइन कामात अडथळे येऊ लागले. त्याचा फटका जगातील 74 देशांना बसला. उद्योग, देशोदेशींची सरकारे, रुग्णालये आणि विमानसेवेचा बोजवारा उडाला. त्यामुळे अक्षरशः हाहाकार उडाला होता.
Comments are closed.