मिडल ईस्टमध्ये पुन्हा युद्धाचा भडका; इराणचा UAE वर मिसाईल हल्ला, फुजैराह पोर्टवर भीषण स्फोट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मिडल ईस्टमध्ये पुन्हा एकदा युद्ध भडकताना दिसत आहे. इराणने संयुक्त अरब अमीरातवर (UAE) पुन्हा एकदा क्षेपणास्त्र डागले असून फुजैराह पोर्टवर भीषण स्फोट झाले आहेत. या ड्रोन आणि मिसाईल्स हल्ल्यामुळे या भागात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. यासंदर्भात ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने वृत्त दिले आहे.

पेट्रोलियम इंडस्ट्रियल साइटला आग, ३ हिंदुस्थानी जखमी

इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे फुजैराह येथील पेट्रोलियम औद्योगिक क्षेत्राला भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी तातडीने नागरी संरक्षण दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या हल्ल्यात तीन हिंदुस्थानी नागरिक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फुजैराह हे ठिकाण यूएईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण युद्धाच्या परिस्थितीत होर्मुज सामुद्रधुनीला वळसा घालून तेल वाहतूक करण्यासाठी या पाईपलाईनचा वापर केला जातो.

यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे एअर डिफेन्स सिस्टम सध्या इराणकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. मंत्रालयाने ‘X’ वर स्पष्ट केले की, देशाच्या विविध भागांत ऐकू येणारे आवाज हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केल्यामुळे येत आहेत.

दरम्यान, अमेरिका आणि इराण दरम्यान युद्धविराम लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच यूएईने एकाच दिवसात तीन वेळा मिसाईल अलर्ट जारी केले आहेत. राष्ट्रीय आपत्कालीन संकट आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून हवाई संरक्षण यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले आहे.

Comments are closed.