राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी; मिडलाईन, मुंबई पोस्टल, ठाणे महापालिका उपांत्य फेरीत

स्पर्धेत संभाव्य विजेता म्हणून आघाडीवर असलेल्या आयएसपीएल संघाने बाद फेरीच्या सामन्यात कबड्डीप्रेमींची घोर निराशा केली. रायगडच्या मिडलाइन अ‍ॅकॅडमीच्या धीरज बैलमारे आणि प्रफुल्ल झावरेने वेगवान चढाया-पकडीचा खेळ करत सुरुवातच अशी केली की मध्यंतरालाच २९-११ अशी विजयी आघाडी घेत आयएसपीएलचा पराभव निश्चित केला. त्यानंतर मिडलाईनने आपल्या खेळात बचावात्मकता आणत आयएसपीएलला आपल्या गुणांचा आकडा फार वाढवू दिला नाही. त्यामुळे मिडलाईनने ४६-२७ अशा फरकाने आयएसपीएलचा धुव्वा उडवत जेतेपदाच्या थाटात उपांत्य फेरी गाठली. ठाणे महानगरपालिकेने मुंबई बंदरचे आव्हान ३९-३१ अशी परतावून लावत अंतिम चार संघात मजल मारण्याची किमया दाखवली.

Comments are closed.