लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी हप्त्याला उशीर का? अदिती तटकरे निरुत्तर

महिना उलटला तरी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही. तो कधी मिळणार की बंद झाला अशा संभ्रमात लाभार्थी महिला होत्या. मार्च महिन्यातच फेब्रुवारी-मार्च अशा दोन्ही महिन्यांचे पैसे दिले जातील, असे महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. मात्र पैसे जमा व्हायला उशीर का झाला या प्रश्नावर त्या निरुत्तर झाल्या. फेब्रुवारीचा हप्ता येत्या 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाईल आणि मार्च महिन्याचे पैसे विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा होतील, असे तटकरे यांनी सांगितले.
Comments are closed.