पाऊस उघडल्यावर तटकरेंचा कार्यक्रम लावू, भरत गोगावलेंचा हल्लाबोल

रायगड : महाड येथील चांदे क्रीडांगणावर काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मंत्री भरत गोगावले (Bharat Bhogawale) यांच्या नॅपकिनची नक्कल केली होती. यावरुन मंत्री गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्या या नकलीचा चांगला समाचार घेतलाय. भरतशेठ यांच्या नॅपकिनची नक्कल सगळ्यांनाच करता येत नाही. सुनील तटकरे यांना नॅपकिनसाठी पाऊस उघडल्यावर आम्ही एखादा कार्यक्रम लावू. शिवाय नॅपकिन आम्ही खांद्यावर वेटर सारखी घेत नाही तर काखेत घेतो. त्यामुळे माझ्या नॅपकिनमध्ये गोरगरिब जनतेचे आशीर्वाद आहेत असे म्हणत त्यांनी तटकरेंवर चांगलाच निशाणा साधला.

लोकसभेला सुनील तटकरे यांना मुस्लिम मतांचा फटका बसल्याचे गोगावले म्हणाले.  शिवाय 400 पार चा देण्यात आलेला नारा याचा देखील या मतांना मोठा फटका बसला आहे.  आमदारकी आणि खासदारकीला वेगळी गणित असतात. त्यामुळं त्यांनी हे गणित स्वतः तपासून घेतले पाहिजे. अदिती तटकरे यांना मुस्लिम बहुमोल असलेल्या श्रीवर्धन मतदार संघात 80 हजारांची लीड मिळते तिथेच खासदारकीला सुनील तटकरे यांना 30 हजाराचे फक्त लीड मिळत असेल तर याचे उत्तर त्यांनी शोधावं असा सल्ला तटकरेंना गोगावले यांनी दिला आहे.

खांद्यावर रुमाल ठेवत आणि हात जोडून सुनील तटकरेंनी केली गोगावलेंची नक्कल

रायगडच्या महाडमध्ये स्नेहल जगताप यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली असल्याचे पाहायला मिळाले. खांद्यावर रुमाल ठेवत आणि हात जोडून सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची स्टाईल करून दाखवली आहे. सध्या सुनील तटकरे यांच्या भाषणातील तेवढाच नक्कल केलेला भाग व्हिडीओच्या माध्यमातून चांगलाच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

तटकरेंनी उत्तर देण्यासाठी भरत गोगावलेंची लेक मैदानात

खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची हुबेहूब नक्कल केली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशली मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशातच, तटकरेंना उत्तर देण्यासाठी गोलावले यांची लेक मैदानात उतरली आहे. सुनील तटकरे यांनी रविवारी रात्री महाडमध्ये केलेल्या नकलीला गोगावले यांची लेक शीतल कदम गोगावले यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून उत्तर दिले. शीतल कदम यांनी तटकरे यांचा नक्कल केल्याचा व्हिडीओ स्टेटसला ठेवून नेपकीनने (रुमाल) काय कमाल केली आहे, हे उभ्या आयुष्यात तुम्हाला कळणार नाही, असे सुनावले. शिवसेना समर्थकांना त्यांचे हेच स्टेटस प्रचंड भावले असून त्यांनीही त्याची पुनरावृत्ती करत आपल्या स्टेटसला देखील रुमालाने लै केली कमाल असे गीत वाजवून तटकरे यांना उत्तर दिले.

महत्वाच्या बातम्या:

Raigad Guardian Minister : रायगड पालकमंत्रीपदाचा वाद सुटता सुटेना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट सुनील तटकरेंच्या घरी भोजनासाठी जाणार; गोगवलेंचं स्वप्न पूर्ण होणार की नाही?

अधिक पाहा..

Comments are closed.