देवेंद्र फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान; भाजपची काँग्रेसवर टीका
चंद्रशेखर बावंकुले: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ( Harshvardhan Sakpal ) यांच्यावर टीका केली. काँग्रेसनं महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केल्याचे बावनकुळे म्हणाले. काँग्रेसला अस्तित्वासाठी झगडावं लागतंय, म्हणूनच खालच्या पातळीची टीका केली जातेय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य म्हणजे अत्यंत बालिश, बेजबाबदार आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारं असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य म्हणजे अत्यंत बालिश, बेजबाबदार आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारं आहे. औरंगजेब हा क्रूर, अत्याचारी, धर्मांध शासक होता, ज्यानं हिंदू धर्म आणि हिंदुस्थानच्या अस्मितेवर आघात केले. त्याची तुलना महाराष्ट्राचे लाडके…
– चंद्रशेखर बावंकुले (@cbawkule) मार्च 16, 2025
देवेंद्रजी सर्वांना घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून राज्य चालवत आहेत
औरंगजेब हा क्रूर, अत्याचारी, धर्मांध शासक होता, ज्यानं हिंदू धर्म आणि हिंदुस्थानच्या अस्मितेवर आघात केले. त्याची तुलना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकशाहीवादी, सक्षम आणि विकासाभिमुख नेत्याशी करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. औरंगजेबानं धर्माच्या नावावर हिंदूंचं शिरकाण केलं आहे. मंदिरं पाडली, कर लादले. देवेंद्रजी मात्र सर्वांना घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून राज्य चालवत आहेत. त्यांच्या काळात हिंदू धर्माला अभिमानानं उभं राहण्याची संधी मिळाली.
सपकाळ आणि काँग्रेसनं खालची पातळी गाठली
औरंगजेबाची तुलना देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी करुन काँग्रेस महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करत आहे. सपकाळ आणि काँग्रेसनं खालची पातळी गाठली आहे. त्यांच्या याच बालिश मानसिकतेमुळे काँग्रेसला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावं लागतंय आणि असे हास्यास्पद वक्तव्य करून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, ती सपकाळ आणि काँग्रेसला जागा दाखवून देईल असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या:
Harshawardhan Sapkal On Devendra Fadnavis: महाराष्ट्राचं गृहखातं घाशीराम कोतवाल चालवत आहे का? आरोपी सैराट फिरतायत: हर्षवर्धन सपकाळ
अधिक पाहा..
Comments are closed.