Minister Dada Bhuse praised those who passed 12th exam and gave valuable advice to failed students


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सर्वांना उत्सुकता होती, ती बारावीच्या निकालाची. हा निकाल आज सोमवारी (ता. 5 मे) दुपारी 1 वाजता जाहीर झाला आहे. त्याआधी सकाळी 11 वाजता शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून राज्याचा निकाल 91.88 टक्के लागल्याचे जाहीर करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही बारावीमध्ये मुलींनी बाजी मारली आहे, तर कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. या निकालानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. (Minister Dada Bhuse praised those who passed 12th exam and gave valuable advice to failed students)

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे. या परीक्षेतील यशानंतर त्यांना आपल्या आवडीनुसार विविध क्षेत्रांमध्ये वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. या माध्यमातून स्वत:ची आणि पर्यायाने देशाची प्रगती साधण्याची संधी मिळणार असल्याने ते या संधीचे सोने करतील, असा विश्वास आहे. तथापि, ही परीक्षा हे अंतिम ध्येय नाही, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही, त्यांनी नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावे, असा सल्ला मंत्री दादा भूसे यांनी दिला आहे.

हेही वाचा… Vaibhavi Deshmukh HSC Result : वडिलांची निर्घृण हत्या, पण तीने जिद्द सोडली नाही; वैभवी देशमुखचे बारावीत घवघवीत यश

शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, कोकण या नऊ विभागांमधून 14 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 13 लाख 02 हजार 873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांची टक्केवारी 91.88 टक्के इतकी आहे. खासगी विद्यार्थ्यांची संख्या एकूण 36 हजार 133 इतकी होती, त्यापैकी 35 हजार 697 जणांनी परीक्षा दिली, त्यापैकी 29 हजार 892 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे 17 नंबर फॉर्म भरून परीक्षा दिलेल्या आणि त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 73.73 टक्के इतकी आहे. तर पुर्नपरीक्षा अर्थात 42 हजार 024 रिपीटर्स विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली होती. त्यापैकी 15 हजार 823 रिपीटर्स विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिपीटर्स विद्यार्थ्यांची उत्तीर्ण टक्केवारी 37.65 टक्के इतकी आहे.

विभागीय निकाल…

पुणे – 91.32
नागपूर – 90.52
छत्रपती संभाजीनगर – 92.24
मुंबई – 92.93
कोल्हापूर – 93.64
अमरावती – 91.43
नाशिक – 91.31
लातूर – 89.46
कोकण – 96.74



Source link

Comments are closed.