नवी मुंबईतील भूखंडावरून मंत्री गणेश नाईक आक्रमक, मिंधेवर केला हल्लाबोल
राज्यातील मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा कडक शब्दात इशारा दिला आहे. नवी मुंबईतील भूखंडावरून त्यांनी मिंधेना दिलेल्या इशाऱ्यामुळे वातावरण पुन्हा चांगलेच तापले आहे. नवी मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी मी भूखंड मागितले होते, हॉस्पिटल, गार्डन याकरता आमच्याकडून भूखंडांची मागणी होत आहे. परंतु ही मागणी पूर्ण होत नसेल तर, मंत्रिपद चाटायचं आहे का? असा प्रश्न गणेश नाईक यांनी उपस्थित केला. नवी मुंबईतील भूखंडांच्या प्रश्नावर गणेश नाईक चांगले आक्रमक झाले आहेत.
नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम दलालांनी केलं आहे. ज्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री आहे. त्याच मंत्रिमंडळाच्या नगरविकास खात्यामधील लोकांकडून हे काम होत आहे. माझा राग शांत करायचा असेल तर, सर्व भूखंड परत करा असा इशाराच यावेळी नाईक यांनी दिलेला आहे.
शहरातील प्रलंबित कामे तसेच पायाभूत सुविधांचा अभाव आणि प्रशासनाच्या कामकाजावर त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच मिंधेवर निशाना साधत त्यांनी जबाबदारी निश्चित करण्याची देखील मागणी केली. त्यामुळेच नवी मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावरुन राजकीय वाद अधिक पेटणार असे दिसत आहे.
Comments are closed.