Minister Nitesh Rane receives grand welcome in Sindhudurg asj
तेजस्वी काळसेकर, सिंधुदुर्ग : तब्बल 51 जेसीबी आणि 2 क्रेनच्या माध्यमातून पुष्पहार आणि फुलांचा वर्षाव करत राज्याचे मत्स्य, बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या खारेपाटण येथे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर आमदार नितेश राणे हे पहिल्यांदाच रविवारी, (22 डिसेंबर) सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहोचले होते. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जनतेने नितेश राणेंवर अभिनंदनाचा वर्षाव केला. (Minister Nitesh Rane receives grand welcome in Sindhudurg)
हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; केली ही विनंती
– Advertisement –
“स्वागतासाठी उधळलेल्या प्रत्येक फुलाचे श्रेय हे या जनतेला आहे. त्यांचा विश्वास आणि साथीमुळे हे सर्व शक्य झाले.” अशा भावना मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एवढे भव्यदिव्य स्वागत अनुभवण्याचा मान मंत्री नितेश राणे यांना मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. खारेपाटण येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. दोन मोठ्या क्रेनच्या माध्यमातुन भव्य पुष्पहार त्यांच्या स्वागतासाठी ठेवण्यात आला होता. तसेच, पुष्पवृष्टी करण्यासाठी तब्बल 51 जेसीबी सज्ज होते.
मंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण येथे आगमन झाल्यानंतर घोषणाबाजी करत आणि फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. तसेच, ढोल पथकांच्या वाद्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी रथावर स्वार होत मंत्री नितेश राणे हे मुख्य मंच्याकडे जात असताना 51 जेसीबींच्या माध्यमातुन पुष्पवृष्टी करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
– Advertisement –
मंत्री नितेश राणे राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणुन पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोहोचणार असल्याने शासकीय रिवाजानुसार खारेपाटण येथे प्रथम कणकवलीचे तहसिलदार दिक्षांत देशपांडे तसेच कणकवली पोलीस निरिक्षक मारुती जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, मंत्री नितेश राणे हे हेलीकॉप्टरने राजापूर येथे पोहोचले. यावेळी राजापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते खारेपाटण येथे रवाना झाले.
Edited by Abhijeet Jadhav
Comments are closed.