Mumbai fire – कफ परेड भागातील चाळीत अग्नितांडव; 15 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू, तिघे गंभीर जखमी

मुंबईतील कफ परेड भागात असणाऱ्या मच्छिमार नगर परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास चाळीला आग लागली. या आगीत होरपळून एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळआलेल्या माहितीनुसार, मच्छिमार नगर येथील चाळीच्या पहिल्या मजल्यावर पहाटे चारच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी बचावकार्य सुरू करत चार जणांच्या आगीच्या विखळ्यातून बाहेर काढले.
जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी 15 वर्षीय यश खोत याला मृत घोषित केले. तर देवेंद्र चौधरी (वय – 30) यांची प्रकृती चिंताजनक आहे. विराज खोत आणि संग्राम कुर्णे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
न्यूज अलर्ट! मुंबईतील कफ परेड परिसरातील चाळीला आग लागून एक ठार, तीन जखमी: अधिकारी. pic.twitter.com/hb7mbvYKSL
— प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@PTI_News) 20 ऑक्टोबर 2025
Comments are closed.