ऑटो रिक्षात बसू दिले नाही म्हणून चालकाची हत्या, अल्पवयीन मुलाचे कृत्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ऑटो रिक्षामध्ये बसण्यास टोकले म्हणून रागाच्या भरात एका अल्पवयीन मुलाने रिक्षावाल्याच्या मानेवर वार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना कुर्ला नेहरू नगर येथे घडली. पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतले आहे.

कुर्ल्याच्या साबळे नगरातील न्यू रेल्वे कॉलनी बिल्डिंग क्रमांक 105च्या समोर रस्त्यावर जयराज नायडू (48) यांनी त्यांची ऑटो रिक्षा उभी केली होती. त्याच परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाला जयराज यांनी रिक्षामध्ये बसण्यास टोकले. आपल्याला रिक्षात बसू न दिल्याचा राग त्याला आल्याने त्याने सोबत आणलेल्या चाकूने जयराज यांच्या मानेवर डाव्या बाजूला वार केला. हा वार इतका गंभीर होता की जयराज हे जागेवर रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना जखमी अवस्थेत राजावाडी इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Comments are closed.