केरळमध्ये 62 जणांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला

14 आरोपींना न्यायालयीन कोठडी

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

केरळच्या पथनामथिट्टा जिल्ह्यात एका दलित अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. या 14 आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पीडितेवर 2 वर्षांच्या कालावधीत 62 जणांनी बलात्कार केला होता. या सामूहिक बलात्कार प्रकरणी चौकशी केली जात आहे. अन्य आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर पथनामथिट्टा जिल्ह्dयातील दोन पोलीस स्थानकांमध्ये 9 गुन्हे नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

पीडित मुलीचे वय 18 वर्षे आहे. वयाच्या 13 व्या वर्षापासून तिचे 62 जणांनी लैंगिक शोषण केले होते. मुलीचे तिचा क्रीडा प्रशिक्षक, सहकारी अॅथलिट्स आणि सोबत शिकणाऱ्या मुलांनी शोषण केल्याचे पुरावे मिळाले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आवाहन करत राष्ट्रीय महिला आयोगाने पोलीस अधिकाऱ्यांना तीन दिवसाच्या आत कारवाईचा विस्तृत अहवाल सादर करण्याचा निर्देश दिला आहे. केरळ महिला आयोगाने देखील याप्रकरणाची दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पी. सती देवी यांनी पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर करण्याचा निर्देश दिला आहे. हे प्रकरण बाल कल्याण समितीकडून आयोजित समुपदेशनाच्या दरम्यान उजेडात आले होत. एका शैक्षणिक संस्थेत पीडितांच्या शिक्षकांनी समितीला तिच्या वर्तनात झालेल्या बदलांविषयी माहिती दिली होती. यानंतर समितीने पोलिसांना कळवून तपास करण्यासाठी विशेष पथक नियुक्त केले होते.

पीडित मुलगी 13 वर्षांची असताना तिचे लैंगिक शोषण सुरू झाले होते. सर्वप्रथम तिच्या शेजाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला होता. त्याने मुलीचे अश्लील व्हिडिओ लोकांदरम्यान शेअर केले होते. यानंतर अनेकांनी तिला ब्लॅकमेल करत तिचे लैंगिक शोषण केले होते.

Comments are closed.