Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

मिरा-भाईंदर महापालिकेत अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहेत.. अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं सुरू असल्याच्या तक्रारी आहेत….. ९५ पैकी ४८ मतदारसंघ महिलांसाठी राखीव झालेत. त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ आरक्षित झाल्यानं त्यांची अडचण झालीय…   त्यामुळे यंदाच्या निवडणुकीबाबत ज्येष्ठ नागरिकांना काय वाटतं…  त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी

इतर महत्वाच्या बातम्या – 15 Nov 2025 :

पूर्व विदर्भातील 56 नगर पंचायत, नगरपरिषदच्या  निवडणुकीसाठी  शिवसेनेने तेराशे एबीफार्म दिले. त्यामुळे भाजपची वाट न पाहता शिवसेना विदर्भात स्वबळाच्या तयारीत असल्याच्या चर्चा
धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा फॉर्मुला ठरल्याची माहिती, धाराशिव, कळंब, मुरूम नगरपरिषदेत अध्यक्षपदाचा उमेदवार ठाकरे सेनेचा असल्याची माहिती,तर तुळजापूर आणि नळदुर्ग नगरपरिषद काँग्रेसला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळाल्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा, निवडणूक आयोगाने याचा फेर विचार करावा अन्यथा ओबीसी महासंघ न्यायालयात जाणार, बबनराव तायवाडे यांची माहिती
अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल…जोरदार शक्तिप्रदर्शन करत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नाईकासंह इतर उमेदवारांकडून अर्ज दाखल
सावंतवाडी नगरपरिषदेत नगराध्यक्षासाठी शिंदे शिवसेनेकडून महिला जिल्हाप्रमुख निता सावंत कविटकर यांना उमेदवारी जाहीर. तर युती झाल्यास काही अर्ज मागे घ्यावे लागतील याची कल्पना उमेदवारांना दिल्याचे केसरकरांनी स्पष्ट केलं
नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचे थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, नाशिकमध्ये ‘ऑपरेशन बिबट्या’ यशस्वी, तब्बल दोन तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश, बिबट्याच्या हल्ल्यात तिन जण जखमी..

Comments are closed.